Home क्राईम फत्तेपूर पोलिसांची गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात धडक मोहीम; लाखोंचा मुद्देमाल नष्ट!

फत्तेपूर पोलिसांची गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात धडक मोहीम; लाखोंचा मुद्देमाल नष्ट!

0
3

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गोंदे गावात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात फत्तेपूर पोलिसांनी धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या कारवाईत चार गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण ४ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले, तर ३० लिटर तयार गावठी दारू जप्त केली. या कारवाईत एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट व जप्त करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय यंत्रणा सतर्क करून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार फत्तेपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन केले.

 

त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी सकाळी फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोंदे, ता. जामनेर येथे कोंब नदीनाल्या काठी तसेच जलकी धरण परिसरात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी एकूण चार गुन्हे दाखल केले. घटनास्थळावरून १ हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले, तसेच ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली.

या कारवाईत जाबीर हसन तडवी (वय ३८), फकीरा रमेश तडवी (वय ३७), हजराबाई युनूस तडवी (वय ३४) आणि रहमान कासम तडवी (वय ७२, सर्व रा. गोंदे, ता. जामनेर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम तसेच पाचोरा विभागाच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.

जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound