नवीन शेती घेण्यासाठी तीन लाखांची मागणी करत विवाहितेला मारहाण

पहूर-लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथे राहणाऱ्या विवाहितेला नवीन शेती घेण्यासाठी माहेरहून तीन लाखांची मागणी करत छळ केला पतीला दुसरी पत्नी करायची असल्या कारणावरून देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी शुक्रवार २६ मे रोजी पहूर पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील माहेर असलेल्या वर्षा अरुण पडवाळ यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील अरुण भिका पडवाळ  यांच्याशी सन २०१७ मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. दरम्यान विवाहितेने माहेरहून नवीन शेती घेण्यासाठी ३ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शारीरिक व मानसिक छळ केला. शिवाय पतीला दुसरी पत्नी करण्यासाठी स्टॅम्प पेपरवर ना हरकत सही करावी, असे देखील दबाव टाकून मारहाण करण्यात आली.  हा प्रकार सहन झालाने विवाहिता माहेरी पिंपळगाव येथे निघून आल्या. त्यानंतर शुक्रवारी २६ मे रोजी विवाहितेने पहूर पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती अरुण भिका पडवाळ,  सासरे  भिका संगा पडवाळ  आणि सासू सविताबाई भिका पडवाळ  सर्व रा. मोताळा जि. बुलढाणा यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.

Protected Content