शेतात लागलेल्या आगीत बाजरी पिकासह चारा जळून खाक

पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा शिवारात बाजरीच्या पिकाला अचानक आग लागल्याने सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत बन्सीलाल लाहोटी (वय 56 राहणार यशोदानगर पाचोरा) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा शिवारात शेत आहे. या शेतात त्यांनी बाजरी कापून ठेवलेले होते शिवाय बाजूला चारा देखील होता. दरम्यान शुक्रवारी २६ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने शेतात ठेवलेले बाजरीचे पीक, चारा आणि प्लास्टिक ठिंबक नळ्या असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. याबाबत शेतकरी चंद्रकांत लाहोटी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यानुसार अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक सचिन निकम करीत आहे.

Protected Content