विवाहितेला ब्लॅकमेल करून सलग ३ वर्षे अत्याचार ; बँक व्यवस्थापक आरोपी

 

जळगाव  : प्रतिनिधी । विश्वासघाताने आधी विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर पुढे ३ वर्षे सतत ब्लॅकमेल करीत लैंगिक शोषण करणाऱ्या बँक व्यवस्थापक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

शहरातील  विवाहितेला कोल्ड ड्रिंक्समध्ये  काही तरी टाकल्यावर ते पाजून  तिची शुध्द हरपल्यावर तिच्या संमतीविना अत्याचार केला. नंतर अत्याचार करतांनाचे फोटो, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यासह पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारण्याची व  आत्महत्येची धमकी देवून २०१७ ते २०२० सलग तीन वर्ष विवहितेवर विविध ठिकाणी अत्याचार  केले . आरोपी  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निंभोरा शाखेचा मॅनेजर अशोकनाथ सिताराम शर्मा ( रा. जयश्री अपार्टमेंट नवीमुंबई वुलवे ) याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार  ३८ वर्षीय पिडीता शहरात वास्तव्यास आहे. तिला दोन मुले असून घटस्फोट झाल्याने मुलांसह माहेरी राहत आहे. घटस्फोट होण्याआधी सप्टेंबर २०१७ मध्ये विवाहिता तिच्या मैत्रिणीसोबत पंतप्रधान योजनेतील कर्ज संदर्भात माहिती घेण्यासाठी शिवकॉलनी येथील स्टेट बॅक  शाखेत गेली होती. बॅकेचे मॅनेजर अशोकनाथ सिताराम शर्मा यांच्यासोबत पिडीतेची भेट झाली. शर्मा यांनी पिडीतेचा मोबाईल नंबर घेतला. मोबाईलवर विवाहितेला मेसेज येवू लागले.

 

लोनसंदर्भात सुटीच्या दिवशी बॅकेत गर्दी नसते, त्यावेळी बँकेत या असे शर्मा याने पिडीतेला मोबाईलवर संपर्क साधून सांगितले. त्यानुसार पिडीता सुटीचया दिवशी बँकेत गेली असता, शर्मा याने पिडीतेला पिण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स  दिले. शर्मावर विश्‍वास ठेवून पिडीतेने ते पिले. कोल्ड ड्रिंक्स पिल्यावर  पिडितेला काहीच उमजत नव्हते, शुध्द हरपली. संधी साधून शर्मा याने पिडीतेवर तिच्या संमतीविना अत्याचार केला. शर्मा याने अत्याचार करतांनाचे फोटो व व्हिडीओ क्लिप तयार केली होती .

Protected Content