Home क्राईम सिमेंट काँक्रीटच्या कामाच्या वाद : शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला

सिमेंट काँक्रीटच्या कामाच्या वाद : शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला


बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील येवती येथे सिमेंट काँक्रीटच्या कामावरून निर्माण झालेल्या वादातून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास येवती गावात सिमेंट काँक्रीटचे काम सुरू होते. याबाबत तक्रारदार योगेश युवराज माळी (वय २५) यांनी संबंधितांकडे विचारणा केली होती. याच कारणावरून वाद निर्माण झाला. रागाच्या भरात आरोपींनी संगनमत करून लोखंडी रॉड व काठ्यांच्या सहाय्याने योगेश माळी यांना बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी प्रमोद वामन धामोडे, गुलाबखान पठाण, एजाजखान बुदनखान, शेख जाकीर, तौफिक शेख आणि तौसिक शेख (सर्व रा. येवती) यांच्याविरोधात बीएनएसच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून पोलीस नाईक शशिकांत महाले पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound