पैशांवरून चहा विक्रेत्याला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेट्रो सिनेमा जवळ चहाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चहा विक्रेत्याला मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेट्रो सिनेमा जवळ पंकज पवार हा चहाचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे सोमवारी ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आपल्या दुकानावर चहा विक्री करत होता. त्यावेळी राजू किसन कोळी (वय-४५, रा. जिजाऊ नगर, जळगाव) याने चहा घेतली. चहा पिल्यानंतर चहा विक्रेता पंकज पवार याने चहाचे पैसे मागितले. याचा राग आल्याने राजू कोळी याने चहाचे भांडे डोक्यात टाकून चहा विक्रेता पंकज पवार याला जखमी केले. जखमी झालेल्या चहा विक्रेत्याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी राजू किसन कोळी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील हे करीत आहे.

Protected Content