पिंप्राळ्यात दोन गटात तुफान हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोमधील भिम नगरात काहीही कारण नसतांना दोन गटात तुफान हाणामारी होवून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात परस्पर विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोमधील भिम नगरात काहीही कारण नसतांना दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी ३ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील दोनजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पहिल्या फिर्यादीत पप्पु शिरसाठ यांच्या तक्रारीवरून सतिष केदार, प्रकाश सोनवणे आणि अश्विन सुरवाडे सर्व रा. पिंप्राळा हुडको, जळगाव यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात सोमवारी ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या फिर्यादीत आश्विन हेमराज सुरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनू शिरसाठ, मुकेश शिरसाठ दोन्ही रा. पिंप्राळा हुडको याच्यावर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी हे करीत आहे.

Protected Content