जामनेर व्यापारी संकुल घोटाळा : चौकशीसाठी समिती जिल्हा परिषदेत दाखल (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । जामनेरातील व्यापारी संकुल घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारच्या ग्राम विकास खात्याने नेमलेली समिती आज जिल्हा परिषदेत दाखल झाली

जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर खटोड बंधू भागीदार असणार्‍या कंपनीला व्यापारी संकुल बांधण्याची परवानगी देऊन २०० कोटी रूपयांचा घोटाळा झालेला असून यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे लाभार्थी असल्याचा गंभीर आरोप   तक्रारदार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केला आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर देखील जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याची तक्रार अड. विजय  पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ३० मार्च रोजी केली होती. या तक्रारीची राज्य शासनाने तत्काळ दखल घेत तीन सदस्यांची समिती गठीत करून समितीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  

विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकचे सहायक आयुक्त मनीष सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून सहायक आयुक्त (चौकशी) राजन पाटील व सदस्य सचिव म्हणून सहायक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे. 

विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकचे सहायक आयुक्त मनीष सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून सहायक आयुक्त (चौकशी) राजन पाटील व सदस्य सचिव म्हणून सहायक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. 

समिती अध्यक्ष मनीष सांगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,  राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण असून  याची प्राथमिक माहिती घेत आहोत. याची व्याप्ती कुठपर्यंत आहे याची माहिती आधी आम्ही स्थानिक प्रशासनाकडून घेणार आहोत

https://www.facebook.com/508992935887325/videos/857856161740259

 

Protected Content