सरकारकडून घोषणांचा पाऊस, मात्र प्रत्यक्षात भुलभुलैय्या

sb nana

चोपडा प्रतिनिधी । बाजार भावांची योजना मध्यप्रदेश धर्तीवर अपेक्षित होती तसे न करता जी तरतूद त्यासाठी केली आहे. त्यापेक्षा जास्त कांद्याचे देणे बाकी आहे. गोपीनाथ मुंढे अपघात योजना पूर्ण कुटुंबाला लागू केली पण शेतात मजुरांचा अपघात झाला किंवा विषबाधा झाली तर शेतकऱ्यावर गुन्हा व नुकसान भरपाईचा कायदा त्या ऐवजी शेतात अपघात अथवा विषबाधा कुणालाही झाली. त्यासाठी लागू होऊन किमान ५ लाखांचे संरक्षण अपेक्षित होते.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सर्व कृषी कर्जासाठी सरसकट लागू होण्याची माहिती गोळा केली वर्तमानपत्रात देखील आले सरसकट कर्जमाफी होणार पण शेतकऱ्यांनी भरभरून मते दिल्याने लोकसभेच्या निकालाने सरकारने हुरळून जाऊन ती योजना बासनात बांधली असे दिसते. जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा विहिरीचे पाणी कमी होईल असे माहित नसते पण विहिरी आटल्याने दुष्काळात बागायती पिकांना देखील जिरायती चा निकष लावला व तो नियम बदलून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे होते त्या बाबत देखील मौन आहे व शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. जर १४०सिंचन प्रकल्प पूर्ण आहेत तर दुष्काळ कसा कमी झाला नाही त्यामुळे सिंचन व जलसंधारनाची कामे येत्या निवडणुकी पर्यन्त तरी कागदावर राहतील कारण पावसाळा चे निमित्त नंतर आचारसंहिता म्हणजे माध्यमे कितीही म्हणत असली घोषणांचा पाऊस तरी प्रत्यक्षात भुलभुल्लय्या आहे.

– कोट
महाराष्ट्र सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” असून लोकसभेत मिळालेल्या भरघोस यशाने हुरळून शेतकऱ्यांना भ्रमित करणारा अर्थसंकल्प आहे.
                  -एस.बी.नाना पाटील, सदस्य, सुकाणू समिती

Protected Content