क्रीडा, जळगाव

बुद्धिबळ स्पर्धेत गुणवंत कासार, विवेक बडगुजर व भरत आमले अंतिम विजेते

शेअर करा !

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ५५ खेळाडूंचा सहभाग होता. गुणवंत कासार विवेक बडगुजर व भरत आमले हे या स्पर्धेचे अंतिम विजेते ठरले.

स्पर्धेचे औपचारिक उदघाटन जाणता राजाच्या उपप्राचार्य सुलभा पाटील व कॉर्डिनेटर रंजना महाजन यांनी प्रत्यक्ष पटावर चाल खेळून केले. त्यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख, समितीचे भगतसिंग निकम, संजय सोनवणे, सुरेश पाटील मनपा क्रीडा अधिकारी विवेक आळवणी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ७ फेऱ्या घेण्यात आल्या.तर स्पर्धेत खुला गट व ७,१०,१३वयो गटातील प्रत्येकी तीन विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.

 

विविध वयो गटातील विजेते खालील प्रमाणे

दहा वर्षे वयोगट

आदर्श खैरनार, जयेश सपकाळे ,आराध्या आमले ,अनिका चौधरी

१३वर्षे वयोगट

उज्वल आमले, कृष्णा मराठे, तेजल चौधरी

१५ वर्षे वयोगट

गुंजन नारखेडे, दर्शन गायकवाड,जयदीप जाधव

खुला गट

गुणवंत कासार, विवेक बडगुजर, भरत आमले, वैभव बडगुजर, सोमदत्त तिवारी, जयेश निंबाळकर, आयुष गुजराथी, माही संघवी, पवन धनगर, धरती कुंटे, व सर्वात लहान खेळाडू धैर्या गोला.

विजयी स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चेस बोर्ड व सोंगट्या देण्यात आले पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक प्रेमभाई कोगटा, लक्ष्मीकांत मणियार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पारोळा येथील जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने, जैन स्पोर्टस अकॅडमीचे फारुक शेख ,सार्वजनिक शिवजयंती समितीचे होरीला सिंग, राजपूत, संजय सोनवणे, समीर जाधव, विकास मराठे, खुशाल चव्हाण, सुरेश मराठे आदी उपस्थित होते. प्रेम कोगटा वर हर्षल माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण ठाकरे यांनी केले. तर आभार खुशाल चव्हाण यांनी मानले. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे ,परेश देशपांडे, यांनी कामगिरी पार पाडली.

आपल्याला हे देखील आवडू शकते !


शेअर करा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*