कासोदा परीसरातून ‘ग्रीन आर्मी गृप’ला प्रतिसाद

kasoda news

कासोदा (वार्ताहर)। येथील कासोदा ग्रीनआर्मी ग्रुपला सर्व स्थरातून पाठिंबा मिळत असुन कासोदा ग्रीनआर्मी सदस्यांच्ये मनोबल वाढत आहे. कासोदा ग्रीनआर्मी सदस्यांनी हाती घेतलेला उपक्रम आहे. कासोद्या गावात ज्याचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला, ग्रीनआर्मी गृपतर्फे एक वृक्ष लागवड करावी म्हणुन त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जेष्ठ-श्रेष्ठांच्या हस्ते वृक्ष देऊन त्या व्यक्तीचा सत्कार केले जाते. तेच वृक्ष त्याच्या घराजवळ लाऊन त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी त्याच व्यक्तीच्या अंगी लाऊन देतात.

संपुर्ण महाराष्ट्रातले मुंबई ते नागपुर पर्यंतचे नागरीक ह्या ग्रुपला मदत करत असून पुणे येथे स्थाईक चंद्रशेखर गोसावी यांनी मुलाच्या वाढदिवसा निमित्त रुपये ५ हजार ट्री गार्ड घेण्यासाठी गृप सदस्यांच्या हाती सुपूर्द केले. त्याच बरोबर जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, व मा. जि.प. उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी कासोदा ग्रीनआर्मी ग्रुपची दखल घेऊन ५०० ट्री गार्ड घेण्यासाठी रोख रक्कम भेट दिली तर १८ जुन रोजी कासोदा ग्रीनआर्मीच्या टीमला जळगाव जि.प.चे सदस्य नानाभाऊ महाजन यांनी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांची भेंट घालून देत कासोद्यात होत असलेल्या व्रुक्षारोपणाची सविस्तर माहिती दिली. झाडे लावत असतांना ती जगवण्यासाठी ट्रीगार्डची अत्यंत आवश्यकता असल्याची निकड लक्षात आणून दिली.

यावेळी कासोद्याचे सरपंच भैय्यासाहेब राक्षे हे या टीमला करीत असलेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. सविस्तर माहिती घेतल्यानंतर सीईओ पाटील साहेबांनी या टीमचा झाड देऊन सत्कार केला व कासोदा ग्रीनआर्मीसाठी नानाभाऊ महाजन यांनी त्यांच्या सेस फंडातून ताबडतोब एक लाख रु.तातडीने देणार असल्याचे सांगून काम जोरात सुरु ठेवा, रिझल्ट द्या, अजून मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे. जळगाव जि.प.ने दिलेल्या या प्रोत्साहन पर मदतीबद्दल कासोदा ग्रीनआर्मी मनापासून आभार मानत आहे.

Protected Content