महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना न्याय द्या : रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिकेतील ठेकेदाराकडील सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समावून घेण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)च्यावतीने निदर्शने करण्यात आली.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महानगरपालिकेत विविध भागात गेल्या २० ते २५ वर्षांपासून सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत शहरात साफसफाई काम करणारे कामगार आजही कंत्राटी पद्धतीने काम करीत आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थिती सुद्धा त्यांनी जळगावकरांचे आणि आपल्या परिवाराची काळजी घेऊन स्वच्छतेची कामे केली आहे. त्यांना महानगरपालिका यांनी कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून सरकारी नोकरीत सामावून घेऊन योग्य देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंगळवारी २६ जुलै रेाजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले. याप्रसंगी भरत मोरे, मिलिंद सोनवणे, भास्कर वाघ, नितीन ननवरे, शंकर सोनवणे, दगडू अहिरे, आकाश वाघ,चंदू बागुल, कैलास सोनवणे, नितीन पवार, प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, किरण अडकमोल, संदीप तायडे, नरेंद्र मोरे, मनीषा बाविस्कर, आशालाता पान पाटील, जिजा वाघ, शोभाबाई गायकवाड, अलका नन्नवरे, इंदुबाई डोंगरे, संगीता ससाने, यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content