Home Cities चाळीसगाव समाजसेवक वर्धमान धाडीवाल यांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते गौरव

समाजसेवक वर्धमान धाडीवाल यांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते गौरव


चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील अनेक गरजवंत दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. असे समाजसेवक वर्धमान धाडीवाल यांना दिव्यांग दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजित राहूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कोरोनाच्या काळात रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून विनामूल्य जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. व हजारो दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य स्वखर्चाने उपलब्ध करून दिले असे समाजसेवक वर्धमान धाडीवाल यांचा दिव्यांग दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजित राहूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सेवेची दखल घेऊन जिल्हा समाज कल्याण विभाग, रेड क्रॉस सोसायटी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रायसिंग, भरत चौधरी, गणेश कर, मीनाक्षीताई निकम आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound