पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेतर्फे अभिनव आंदोलन करण्यात आले. यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ‘मृत पावलेल्या वाहनांना’ श्रद्धांजली अर्पीत करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

पेट्रोल डिझेल, ईंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज काँग्रेस भवन येथे जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली शहर उपाध्यक्ष शाम तायडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, रेशन कमिटीचे अध्यक्ष वासुदेव महाजन, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अनु.जाती-जमाती अध्यक्ष मनोज सोनवणे, जमी शहराध्यक्ष प्रदीप सोनवणे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद पठाण, उद्धव वाणी, दिपक सोनवणे, मनोज चौधरी, जाकीर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी दुचाकीवर कफन टाकून श्राद्ध करून उपरोधिक आंदोलन करण्यात आले.

दरवाढ तात्काळ रद्द करा : देवेंद्र मराठे
जळगाव जिल्हा एन.एस.यु.आय.च्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देत केंद्र सरकारकडे मागणी केली की, पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा एन.एस.यु.आय.च्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी भविष्यात आक्रमक पवित्रा हाती घेण्याचा इशाराही देण्यात आला.

नाहीतर तीव्र आंदोलन छेडू ; जिल्हाध्यक्ष अॅड. पाटील

केंद्र सरकार पेट्रोल डिझेलची दरवाढ मनमानी पद्धतीने करत आहे. नफे खोरीला उत्तेजन देण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. कोरोनामुळे जनता त्रस्त झाली असतांना पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने ती अधिक त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी, केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही असा प्रश्न पडला असल्याचे जिल्हाध्यक्ष, अॅड. संदीप पाटील यांनी सांगितले. जर दर कमी झाले नाहीतर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा अॅड.पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांना पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात निवेदन जिल्हाध्यक्ष, अॅड. संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी अध्यक्ष उदय पाटील, जळगाव शहर उपाध्यक्ष शाम तायडे, जिल्हा सरचिटणीस, अजबराव पाटील, जिल्हा जाॅइंट सेक्रेटरी जमील शेख , मनोज चौधरी .वासुदेव महाजन, जगदीश गाढे, देवेंद्र मराठे, अमजद पठाण, जगदीश सोनवणे, .बाबा देशमुख, मनोज सोनवणे, जाकीर बागवान, .नदीम काझी, प्रदीप सोनवणे,समवेत कार्यकर्ते उपस्थित होते.

लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1639450959536535/

लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2787020098195154/

Protected Content