शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती

युवाशक्ती

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील युवाशक्ती फौंडेशनतर्फे गुरुवारी शिक्षक दिनानिमित्ताने सायंकाळची श्री गणेशाची महाआरती समाज शिक्षक अद्वैत दंडवते आणि पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या हस्ते करण्यात आली.

काव्यरत्नावली चौकात युवाशक्ती फौंडेशनतर्फे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदा ११ वे वर्ष आहे. संध्याकाळी वंचित घटकातील, कचरा वेचणारे, मजुरांच्या मुलांना शिकविणारे आणि समता नगर व तांबापुरा येथे आनंद घरद्वारे शिक्षण सेवा देणारे समाज शिक्षक अद्वैत दंडवते यांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्ताने महाआरती करण्यात आली. प्रसंगी दंडवते यांनी, दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी समाजातील दानशुरांनी आर्थिक किवा वस्तूरूपाने मदत करावी असे आवाहन केले. तर यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी भारतीय सैन्य दलाची माहिती दृकश्राव्य माध्यमाद्वारे ऐकली. सैन्य दलात कोणत्या प्रकारे करियर करता येईल याबाबत असणारी माहिती आणि फलक पाहून त्यांनी कौतुक केले. यावेळी उत्सव अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, कार्याध्यक्ष तेजस दुसाने, सचिव पवन माळी यांसह मनजित जांगीड, विराज कावडिया, अमित जगताप, दीक्षांत जाधव, पियुष हसवाल आदि उपस्थित होते.

Protected Content