रायुकॉच्या युवक जोडो अभियानास प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक जोडो व संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त पक्षसंघटन मजबूत व्हावं व जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी पक्षाच्या माध्यमातून दिलेलं विविध क्षेत्रातील योगदान तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावं म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगावतर्फे आजपासून युवक जोडो अभियान व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. यानिमित्त या अभियानाची नियोजन बैठक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पार पडली.

यावेळी जिल्हाभरातील युवक बूथ कमिट्याचे उद्घाटन झाले व नवीन फॉर्म भरून घेण्यात आलेत. तसेच वन बूथ, टेन युथ ही प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटीलसाहेबांनी मांडलेल्या संकल्पेच्या यशस्वीतेसाठीही चर्चा झाली व त्याअंतर्गत बूथ कमिट्या सक्षम करण्यासंदर्भात निर्धार करण्यात आला. महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येणारी जनहितार्थ कामे जनतेपर्यंत पोहचवणे व शेतकरी, महिला,विद्यार्थी, नोकरदार, कामगार तसेच सामान्य जनतेच्या अडचणी व समस्या समजावून घेऊन त्या प्रदेश स्तरावर सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणे, याशिवाय वन बूथ टेन युथ या संकल्पनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात युवक राष्ट्रवादीतर्फे जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यात निरीक्षक नेमून ५०० शाखा उदघाटन करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी सांगितले व या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपापल्या मनोगतात व्यक्त केली.

बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष  अँड.  रविंद्र पाटील होते. त्यांच्यासमवेत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा सौ.रोहिणीताई खडसे, ज्येष्ठ नेते  संजयदादा गरुड यांनीही आपली मनोगते व्यक्त केलीत.

बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी केले.

सदर बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, माजी युवक जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा दुध संघ संचालक मधुकर राणे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई शेख, युवती जिल्हाध्यक्षा सौ.कल्पिता  पाटील, सौ.अश्विनी  देशमुख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष  अरविंद मानकरी, युवक कार्याध्यक्ष  दिपक  पाटील,  प्रशांत  पाटील,युवक समन्वयक  आबा  पाटील,  संदिप पाटील, अशोक  पाटील,  अशोक  लाडवंजारी,  एजाज  मलिक, .शिवराज  पाटील,  दिलीप  माहेश्वरी, व कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हाउपाध्यक्ष वाय आर पाटील यांनी केले तर आभार जिल्हा समंवयक आबा पाटील यांनी मानले त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष शहरअध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.