बालिकेवर अत्याचारप्रकरणी एकावर दोषारोप सिध्द; उद्या सुनावणी जाणार शिक्षा

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । आईच्या दुचाकीची चाबी मागण्यासाठी घरी आलेल्या सात वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याच्या घटनेच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दोषी ठरविण्यात आले असून त्याच्यावर उद्या शनिवारी कामकाज होणार आहे.

या घटनेची माहिती अशी, १५ एप्रिल २०१७ रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पीडित सात वर्षीय बालिका आपल्याच घराशेजारी राहत असलेला आरोपी हिरामण चौधरी (वय- 39)याच्या घरी तिच्या आईच्या दुचाकीची चाबी घेण्यासाठी गेली होती. चाबी घेण्यासाठी गेलेली बालिका बराच वेळ होवूनही घरी न परतल्याने बालिकेची आई संशयित आरोपी हिरामणच्या घरी आली. संशयिताचा घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आला. त्यावेळी पिडीत बालिकेच्या आईने दरवाजा ठोठावला असता तिला घरातून बालिकेच्या रडण्याचा आवाज आला. महिलेने आरडाओरड केल्याने गल्लीतील आणि शेजारील नागरिक घटनास्थळी धावून आले. बराच वेळ झाल्यानंतर संशयित आरोपी हिरामण चौधरी याने दरवाजा उघडला. संशयित त्यावेळी अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. तत्काळ त्याने कपडे घालून संशयिताने पीडितेच्या आईला धक्का देत धमकावत घटनास्थळापासून पळ काढला. याप्रकरणी बालिकेने कैफियत सांगीतल्यानंतर पीडितेच्या आईने एमआयडीसी पोलिसात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर संशयित हिरामण चौधरी याच्याविरूध्द पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती उपनिरीक्षक रोहन खंडागळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात खटल्याच्या चौकशीत सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पंच, डॉ. सुरज वाणी, डॉ. निता भोळे, तपासी अधिकारी डॉ. रोहन खंडागळे, पीडित बालिका, पीडितेचे आई, वडिल यांच्या साक्षीदार तपासले व त्या महत्त्वपूर्ण ठरल्याने संशयित आरोपी हिरामण चौधरी याला आज दोषी ठरविण्यात आले. उद्या (शनिवारी) या गुन्ह्यातील शिक्षेवर कामकाज होईल. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.

Protected Content