स्पर्धात्मक युगातील संघर्षाशी लढण्याची खरी प्रेरणा शिवचरित्रातून मिळते — डॉ. तुषार रायसिंग

 

 

जळगाव, प्रतिनिधी । स्पर्धात्मक युगातील संघर्षाशी लढण्याची खरी प्रेरणा शिवचरित्रातून मिळते असे प्रतिपादन डॉ. तुषार रायसिंग यांनी केले. ते विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि सद्यस्थितील महत्व या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी बोलत होते. 

डॉ. तुषार रायसिंग यांनी व्याख्यानातून आजच्या स्पर्धात्मक युगातील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांच्या समोरील असणा-या आव्हानांना पेलण्यासाठी शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे मंत्र दिला. तसेच या विषयाच्या निवडी मागे असलेली भूमिका पटवूनदिली. खरंतर आज कुठलेही प्रत्यक्ष युद्ध आपल्याला लढायचे नाही मात्र तरीही प्रत्यके व्यक्ती आपले जीवन जणू खूप मोठ्या युध्दासारखे असल्याचा समज करून जगत आहे. शैक्षणिक दशेतील युवकांमध्ये देखील अनेक चिंतेने मनात घर करून गेल्याचे चित्र सर्वत्र आहे आणि याच चिंतेला मिटविण्यासाठी गरज असते ती एका सकारात्मक प्रेरणेची व यांसाठी शिवचरित्रापेक्षा अजून मोठे उदाहरण दुसरे कुठलेही असू शकत नाही अशी भूमिका यावेळी डॉ. तुषार रायसिंग यांनी मांडली.

आज महाविद्यालयाच्या ग्रंथालयात शिवपूजन करून स्पर्धा-परीक्षा दालनाची स्थापना करण्यात आली. या दालनासाठी जळगाव शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी देखील सहकार्य केले यात दीपस्तंभ प्रकाशन, प्रशांत पब्लिकेशन आणि पंकज देशमुख, ग्रंथपाल. पी. आर. संस्थेचे महाविद्यालय, धरणगाव यांचा समावेश आहे. स्पर्धा-परीक्षा दालनाचे उदघाटन विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. 

 

तसेच प्रशांत पब्लिकेशनचे कृष्णात पाटील, अनिल जाधव. महाविद्यालयाचे समन्वयक  उमेश इंगळे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी, डॉ. वैजयंती चौधरी, सचिन मावळे, सुनील बारी, मनोज गाडीलोहर,  हितेंद्र सरोदे, आशा पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पाडण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैजयंती चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी यांनी प्रयत्न केले तर  दिनेश ठाकरे  व  ज्ञानेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Protected Content