अनिल चौधरी यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

भुसावळ : प्रतिनिधी । गाळे खरेदीच्या व्यवहारात फसणूकीच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे

सौ ममता सुधाकर सनांसे यांचे रुपये ६० लाख ७० हजार रुपये घेऊन गाळे खरेदी न करून दिल्यामुळे भुसावळ येथील अनिल छबिलदास चौधरी यांच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशन स्टेशन येथे कलम ४२०, ५०४ व ५०६ अन्वय फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता अनिल चौधरी यांनी भुसावळ येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज केलेला होता त्यावर १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली

अनिल चौधरी यांच्या बाजूने एडवोकेट सागर चित्रे यांनी युक्तिवाद करताना सदरचा गुन्हा हा दिवाणी स्वरूपाचा असल्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा असे सांगितले सरकार पक्षाच्या बाजूने सरकारी वकील एडवोकेट शीला गोडांबे यांनी गंभीर आर्थिक स्वरूपाचा हा गुन्हा असून आर्थिक गुन्हेगारी ही समाजाची पाळेमुळे पोखरून काढतात व सदर गुन्ह्यात फसवणुकीची रक्कम मोठी असून सामान्य माणसासाठी खूप मोलाची आहे आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता जामीन मंजूर करू नये आरोपीने पैसे आरटीजीएस द्वारे घेऊन खरी खरेदी खतावर सह्या करून खरेदी खत पूर्ण न केल्यामुळे विश्वासघात केलेला आहे हे स्पष्ट दिसत असल्याने जामीन नामंजूर करावा असा युक्तिवाद केला

पोलिसांतर्फे तपासाधिकारी कृष्णा भोये यांनी कोर्टास विनंती केली की गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करणे असून ती कुठे वापरली गेली याचा तपास करावा याचा आहे खरेदी खतावर केलेल्या सह्या व अंगठा याचा तपास आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय करता येणार नाही या गुन्ह्यात आणखी कोणी सामील आहे किंवा नाही याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला अटक करणे आवश्यक आहे

फिर्यादीतर्फे एडवोकेट कृष्णा बनकर व एडवोकेट बि बी गामोट यांनी काम पाहिले त्यानंतर कोर्टाने तडजोडीची शक्यता असल्यास तडजोड करून वाद निकाली काढावे असा सल्ला एडवोकेट चित्रे व एडवोकेट कृष्ण बनकर यांना दिला परंतु सत्र न्यायाधीश र. रा. भागवत यांच्यासमोर प्रत्यक्ष झालेल्या मध्यस्थीमध्ये तडजोड झाली नाही सत्र न्यायाधीश एस बी भंसाली यांनी अनिल चौधरी यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला

Protected Content