रेल्वे स्टेशन आवारात महिलेवर सुरीने वार

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून एका महिलेला अश्लिल शिवीगाळ करत सुरीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार ३० मे रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सरला अनिल चौधरी (वय-४२) रा. आयोध्या नगर, जळगाव या महिला हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. रविवारी २८  मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास महिलाही कामाच्या निमित्ताने जळगाव रेल्वे स्टेशन जवळील आंबेडकर पुतळ्याजवळ आल्या होत्या. त्यावेळी गाडी पार्किंगला लावण्याच्या कारणावरून विकास अभिमान पवार (वय-३५) रा. तेली चौक, जळगाव या तरुणाने महिलेशी वाद घातला. त्यानंतर त्याने हातातील सुरीने महिलेवर वार करून चापटाबुक्क्यांनी  मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून गंभीर दुखापत केली. हे घटना घडल्यानंतर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विकास अभिमान पवार यांच्या विरोधात मंगळवार ३० मे रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे

Protected Content