किरकोळ कारणावरून तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे कबुतराच्या कारणावरून एका तरुणाला पाठीवर धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  प्रवीण ज्ञानेश्वर पाटील (वय-२१, रा. भगवान नगर, खेडी बुद्रुक, ता. जि. जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून वेल्डिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २९ मे रोजी रात्री १० वाजता तरुण हा घरी असताना चिक्या (पुर्ण नाव माहित नाही) रा. जैनाबाद, जळगाव याच्याशी वाद झाला. या वादातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यात चिक्याने त्याच्या हातातील धारदार वस्तूने पाठीवर वार करून जखमी केले त्यानंतर तो पसार झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर प्रवीण पाटील याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी ३० मे रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र उगले करीत आहे.

Protected Content