कळमसरेत अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साह साजरी करण्यात आली.

 

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील तीन कर्तृत्ववान महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

यात सन्मानपत्र श्रीफळ शाल व रोख ५०० रुपये देऊन अनुक्रमे गावातील मीना रामचंद्र पाटील,  अर्चना राजेंद्र महाजन,  नौशादबी दस्तगीर पिंजारी या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत, ग्रामपंचायत सदस्य  प्रमिला चौधरी,  मीना कुंभार,  लताबाई भिल,  रेश्माबाई चौधरी, दिनकर चव्हाण,  पल्लवी चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.

Protected Content