घरातील कर्ता पुरूष गेल्याने पत्नीसह मुलांचा आक्रोश !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या छतावर पडदीला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी ३१ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी, धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील मुळ रहिवाशी असलेले अरूण मधुकर पाटील (वय-४३) हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात वास्तव्याला होते. एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामाला जावून ते आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी ३१ मार्च रोजी मध्यरात्री ते १ वाजता बाहेर जावून येतो असे सांगून पत्नी व दोन्ही मुले झोपलेले असतांना अरूण पाटील यांनी त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर बाहेरच्या जिन्यातून छतावर गेले. तिथे पडदीला दोरीच्या मदतीने गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी छतावर गळफास घेतल्याने पहाटे ४ वाजता शेजारचांच्या लक्षात आले. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी लागलीच घरत झोपलेल्या त्यांची पत्नी निता आणि दोन्ही मुलांना सांगितले. यावेळी अरूण पाटील यांनी गळफास घेतल्याचे पाहून कुटुंबाने एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी निता, मुलगा अदित्य (वय-१६) आणि मुलगी साक्षी (वय-१८) असा परिवार आहे.

Protected Content