वैद्यकीय अधिकाऱ्याची ४ लाख २३ हजाराची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टराची ४ लाख २३ हजार ७१९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे. विशेष म्हणजे अज्ञात व्यक्तीने डॉक्टरच्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट नंबर काढून पत्नीची बदनामीकारक संदेश पाठविले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात ३५ वर्षीय तरुण हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ९ जुलै ते २१ सप्टेंबर २०२२ दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर एप्लीकेशन पाठवून वैद्यकीय अधिकारी यांना एप्लीकेशन डाउनलोड करण्यास भाग पडले. तसेच अज्ञात व्यक्तीने वैद्यकीय अधिकारी यांच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट नंबर चोरून घेतले. दरम्यान अज्ञात व्यक्तीने वैद्यकीय अधिकारी यांच्या पत्नीबद्दल अश्लील व बदनामीकारक संदेश पाठवून दिल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले आणि पाठवलेल्या पैशांसह व्याजाची रक्कम मागणी केली. यामध्ये समोरील व्यक्तीने दिलेले ६ लाख ८ हजार ७८५ रुपयांवर व्याजरूपी खंडणी स्वरूपात वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून ४ लाख २३ हजार ७१९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुरुवार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

Protected Content