शिरसोली येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उदघाटन

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते फित कापून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि जेनरीक मेडिकल स्टोअर्ससह ए टी एम, डेंटल क्लिनिक, जनरल फिजिशियन , आयुर्वेद क्लिनिक, बालरोग व स्त्री रोग क्लिनिकचे  उद्घाटन आज करण्यात आले.

 

प्रारंभी डॉ. एस.एम. मकवाना, डॉ. विपुल दीक्षित, डॉ. क्षितीज पवार, डॉ. पूजा दीक्षित आणि डॉ. दीपक जयस्वाल यांनी पालकमंत्र्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, डॉक्टर हा समाजासाठी महत्वाचा घटक असून परमेश्‍वराच्या नंतर डॉक्टरांवर रुग्णांचा विश्वास असतो. कोरोनाच्या काळाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. याचा विचार करता शिरसोली सारख्या ठिकाणी एक सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल आणि स्वस्तात औषधी उपलब्ध असणारे जेनरीक औषधीचे दुकान सुरू होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात एक अतिशय दर्जेदार आणि किफायतशीर अशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. . एखादे हॉस्पीटल वा मेडिकल स्टोअर्स हे चांगले चालावे अशी शुभेच्छा देण्यापेक्षा निरोगी समाज निर्मितीसाठी आपण हातभार लावावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर कोरोनामुळे अनेक घरगुती औषधींचा वापर वाढल्याचेही पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

 

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीबाल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संतोष आंबटकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, मुकुंदराव नन्नवरे, सरपंच प्रदीप पाटील, अनिल पाटील, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, माजी सरपंच रामकृष्ण काटोले, पंचायत सभपती नंदलाल पाटील, मुकुंद नन्नवरे, विवेकानंद शाळेचे अध्यक्ष किरण पाटील, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष शिवदास बारी, उपाध्यक्ष गोपाळ खलसे, माजी उपसभापती मुरलीधर ढेंगळे, ग्रामपंचायत सदस्य निळकंठ काटोले, विजय काटोले, अरूण बारी, फुलभंडारचे  संजय बारी, राजू बारी यांची उपस्थिती होती.

Protected Content