मनसेच्या मागणीला यश; साहित्या नगरात लावले पथदिवे !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नितीन साहित्या नगरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून पथदिवे नसल्याने येथील स्थानिक नागरीकांना रात्री अंधारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या परिसरात पथदिवे लावण्यात यावे अशी मागणी मनसेच्या वतीने महानगरपालिकेला केली होती. महापालिकेने मनसेच्या मागणीची दखल घेत अखेर पथदिवे लावण्यात आले आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील नितीन साहित्य नगरात ५०० परिवारासह राहत आहे. हा परिसर महानगरपालिकेच्या हद्दीत वार्ड क्रमांक 19 मधील स्थान असून येथे ८ वर्षापासून अंधार होता. या परिसरात पथदिवे लावण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देवून केली होती. दरम्यान महापालिकेने निवेदनाची दखल घेत नुकतेच पथदिवे लावण्यात आले आहे. त्यामुळे साहित्या नगरातील कॉलनी प्रकाश झोतात उजळून निघाल्याचे पहायला मिळाले. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी शहराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे यांनी कॉलनीतील रहिवाशांना सोबत घेऊन निवेदनाद्वारे आंदोलन करून दहा ते बारा दिवसांपूर्वी मागणी केली होती. आता पथदिवे लावण्यात आल्याने परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Protected Content