जळगाव व रावेरात २३ एप्रिल रोजी मतदान

जळगाव प्रतिनिधी । आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये २३ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. यात देशभरातील मतदान हे एकूण सात टप्प्यांमध्ये घेतले जाणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. यात जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये राज्यातील तिसर्‍या टप्प्यात म्हणजेच २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. दरम्यान, दरम्यान, धुळे व नंदुरबार मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजे 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील हालचाली मोठ्या प्रमाणात गतीमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Add Comment

Protected Content