शाहू नगरातील अतिक्रमण महापालिकेने काढा (व्हिडीओ)

जळगाव राहूल शिरसाळे । शहरातील शाहू नगर येथील अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे आणि पोलीसांशी झालेल्या गैरवर्तणूक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेचे अपर आयुक्त विद्या गायकवाड यांना सोमवारी १८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील शाहूनगर परिसरात होत असलेल्या अतिक्रमण काढण्यात यावे, तसेच या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालून गैरवर्तणूक करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. शाहू नगर परिसरात अतिक्रमण काढून समाजातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, तसेच रात्री बे रात्री गणेश कॉलनी व इतर परिसरातील नागरिक रेल्वेस्टेशनवर जा-ये करत असतात. त्यांना येथील मध्य धुंद नागरिकांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. सर्व व्यावसायिकांना रात्री १० पर्यंत वेळ देण्यात आलेला असताना देखील रात्री २ वाजेपर्यंत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू ठेवलेला असतो. त्यामुळे पोलिसांना देखील जुमानत नाहीत. त्यांच्याशी गैरवर्तन करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भविष्यात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

 

याप्रसंगी  भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल चौधरी, मिलींद चौधरी, महेश पाटील, राहुल मिस्त्री, भुषण भोळे, राहूल पाटील, हर्षल चौधरी, स्वामी पोतदार, सुरज सरोदे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content