मुक्ताईनगरात उद्यापासून नियमित सर्व बस फेऱ्या सुरु होणार !

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सुमारे पाच महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या सकाळी सहा वाजल्यापासून मुक्ताईनगरातील बसेसच्या फेऱ्या सुरू होणार असल्याची मााहिती लाईव्ह ट्रेंडस न्युजच्या हाती लागली आहे.

दरम्यान, उद्यापासून सर्व कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याची माहिती ही मिळाली आहे. तसेच मुक्ताईनगर ते पुणे मुक्ताईनगर ते ठाणे मुक्ताईनगर ते नाशिक मुक्ताईनगर ते नांदुरी गड व सर्व लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील फेर्‍या ही उद्या सकाळी सहा वाजेपासून सुरू होणार आहे. व सर्व मुक्ताईनगर तालुक्यातील जनतेला कळवण्यात यावे असे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुक्ताईनगर आगारातील कर्मचाऱ्यांनी आवाहन केलेले आहे.

 

Protected Content