जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही रुग्ण बाधित आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही. आज भुसावळ तालुक्यातील एक रुग्ण बरा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८०३ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार २२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content