पाचोरा येथे केवलाई फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा सन्मान

पाचोरा, प्रतिनिधी | येथील केवलाई फाऊंडेशन पाचोरा यांच्या मार्फत दहावी वर्गात घवघवीत यश संपादन करणार्यां गुणवंताचा सन्मान करण्यासाठी सोहळ्याचे आयोजन देसले क्लासेसमध्ये आज करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गो. से. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन डाएट जळगांवचे ज्येष्ठ अधिव्याख्याते सी. डी. साळुंखे, सुनिल नेत्रालय हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील पाटील, निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, माध्यमिक विद्यालय बांबरूड खु” (महादेवाचे) येथील मुख्याध्यापक मुकेश पाटील होते. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून व सरस्वती मातेचे प्रतिमापूजन करून करण्यात आली. तर परिसरातील गुणवंत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यात सेवा देणारे पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. यात एस. एस. देसले (आदर्श शिक्षक पुरस्कार), सुधाकर सोनवणे (समाजदुत पुरस्कार), अनिल दुसाने (पर्यावरण प्रेमी शिक्षक), ज्ञानेश्वर पाटील (आदर्श तंत्र स्नेही शिक्षक) यांना पुरस्कार सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंतांचा सत्कारार्थी म्हणून माध्यमिक विद्याल पिंपळगांव शाळेचे इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रंमाकांने उत्तीर्ण झालेली कु. धनश्री सतीश पाटील, व्दितीय – देवेंद्र योगेश पाटीलळ पवन संजय पाटील, तृतीय – राकेश पिरन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यालय बांबरुड खु” (महादेवाचे) येथील शाळेचे दहावीचे प्रथम – गौरव दिलीप भोई, व्दितीय – रागिणी दिलीप पाटील, तृतीय – स्वामी वाल्मीक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगांव येथील बारावी चे प्रथम सविता सुरेश बागुल, द्वितीय – वर्षा संजय माळी, तृतीय – जयश्री शंकर पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला. पिंपळगांव शाळेचा नवोदय विद्यालय मध्ये निवड झालेला साई प्रवीण कोळी याचा ही गौरव करण्यात आला.

याप्रसंगी पाचोरा- भडगांव तालुक्यातील परिसरातील विवीध क्षेत्रातील पदाधिकारी मंडळी, अधिकारी, पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडशन चे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन देवल जोशी यांनी केले. यावेळी उपस्थितांचे आभार नीता पाटील यांनी मानले.

Protected Content