राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाचे यश

जळगाव प्रतिनिधी । चोपडा महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाला शिकत असलेला विद्यार्थी शुभम रतिलाल भिल या विद्यार्थ्याने २९ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे पेठे विद्यालयात पार पडलेल्या ‘लोकसत्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे.

या स्पर्धेसाठी निर्भया आणि नंतर, जंगलाच्या शोधात वाघोबा, स्वच्छ भारत, एक दिवास्वप्न, ज्यांचे त्यांचे गांधी आणि सावरकर आणि ऑलिंम्पिक वर्षात क्रिकेटची चिंता हे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत धुळे, जळगाव, नाशिक व नगर या जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातून ६० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांमधून १० विद्यार्थ्यांची नाशिक येथे ०७ मार्च २०२० रोजी होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीत निवड झाली असून त्यात चोपडा महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम रतिलाल भिल याचा समावेश आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांनी त्याचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. याप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे, वादविवाद व वक्तृत्व मंडळ प्रमुख एम.एल.भुसारे, ए.बी.सूर्यवंशी आदि उपस्थित होते. संस्थेच्या उपाध्यक्षा आशाताई विजय पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे व उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी या विद्यार्थ्याने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले.

Protected Content