मोदींचा लवकरच सोशल मीडियाला राम राम ?

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक ट्विट करून आपण सोशल मीडियाला राम राम ठोकणार असल्याचे जाहीर केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या आजवरच्या वाटचालीत सोशल मीडियाचा महत्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत या माध्यमाचा अतिशय समर्पक वापर केला होता. सोशल मीडियात सर्वाधीक सक्रीय असणारे राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांची ख्याती आहे. सध्या ते ट्विटर, फेसबुक, युट्युब आणि इन्स्टाग्राम या चार डिजीटल मंचावर कार्यरत आहेत. ते दिवसातून अनेक अपडेटस टाकत असतात. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांनी एक ट्विट केले. यात त्यांनी आपण रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्युब आदी अकाऊंट बंद करणार असल्याची माहिती दिली. यामुळे सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content