भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते ऍड. श्याम गोंदेकर यांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये वाहतूक शाखा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ऍड. श्याम गोंदेकर यांना मिळालेल्या पदामुळे भुसावळ शहराच्या शिवसेना शाखा मध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री गोंदेकर शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे . आज शहर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सत्कार करण्यात आला. ऍड. शाम गोंदेकर हे शिवसेना पक्षासाठी गेल्या कित्येक वर्षापासून जनतेची सेवा करीत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांना मिळालेल्या पदामुळे शहरवासीयांना आनंद झाला आहे. त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पद्धतीने पार पाडतील . असे गौरवोद्गार शहर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. तुषार पाटील यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.