Home क्राईम भुसावळ खून : फरार आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना !

भुसावळ खून : फरार आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना !

0
100

wp 1583157605229118542331200165914
 

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जुना सातारा भागात नासिर बशीर पटेल (रा. साकेगाव) येथील गावातील दूध विक्रेत्याचा आज सायंकाळी खून झालाय. थोड्या वेळापूर्वीच पोलिसांना आरोपीचे नाव समजले असून त्याच्या शोधार्थ पथक रवाना झाल्याचे कळते.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,   शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जुना सातारा परिसरातील कोळी वाड्यात धिरज शिंदे यांच्या घरी नसीर बशीर पटेल (वय 35) हा तरुण नेहमी प्रमाणे आज सायंकाळी आपल्या मित्रासह 5.45 वाजेच्या सुमारास मोटरसायकल (एम.एच.19 ए.डी.2006) वर दूध वाटपासाठी आला होता. याच वेळी धिरज शिंदे यांने अचानक नसीर बशीर पटेलच्या डोक्यात लोखंडी रोडने तीन वेळा वार केला. या हल्ल्यात नासिर ठार झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकार गजानन राठोड ,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व वातावरणाला नियंत्रणात आणले. मयत इसमास जळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.घटनास्थळी मयत इसमाचे नातेवाईक येऊन गेले आहेत. दरम्यान, धीरजने खून का केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शेवटचे वृत्त समोर आले तेव्हा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


Protected Content

Play sound