रत्नापिंप्रीत अचानक घराची भिंत कोसळली; सुदैवाने सर्व बचावले

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील रत्नापिंप्री येथे  सुमारास भाईदास नामदेव मराठे यांच्या राहत्या घराची भिंत सकाळी ११ वाजता अचानक कोसळल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने सर्व बचावले आहे.

भिंत कोसळल्याचा आवाज एवढा होता की आजुबाजुचे नागरीकांची एकच धावपळ उडाली आणि अचानक असे कसे याबाबत तर्क वितर्क लढवित घराकडे धाव घेऊन त्यात कुणी दबले तर नाही ना याबाबत विचार पुस करू लागले. मात्र सुदैवाने या भागात घरचे कुणी ही नव्होते घरचे लोक शेतात तर भाईदास मराठे ओट्यावर बसले होते तर आज शाळेला सुट्टी असल्याने मुले  मधल्या घरात जेवण करीत होते, आवाज येताच सर्व घरा बाहेर पळत निघाले, घराच्या मागच्या बाजूला ४८ फूट भिंतीचा भाग कोसळला.

यात संसारोपयोगी वस्तूची गैस, दाळी, डबे, खाद्य बाजरी, गहू इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घराचा जो भाग कोसळला, त्याठिकाणी कुणी नव्होते यामुळे अनर्थ टळला आहे, परंतू या कुटुंबाला आजच बेघर होण्याची स्थिती निर्माण झाली असून तलाठी यांनी पंचनामा करून वरीष्ठांना याबाबत माहिती देवून या कुटुंबाला लाभ मिळवून द्यावा अशी मागणी प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Protected Content