धक्कादायक : शासकीय गोदामातून धान्याची होतेय चोरी; परिसरात उलटसुलट चर्चा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शासकीय धान्य गोडाऊनमधून रोज रात्रीच्या सुमारास आठ ते दहा किंटल धान्याची चोरी होऊन ते काळ्या बाजारात विकले जात आहे. त्याला जबाबदार कोण? बाहेरील कोणी व्यक्ती की महसूल पुरवठामधीलच कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे. हा काळा गोरखधंदा म्हणजे शेतच कुंपण खाते की काय ? अशी परिस्थिती मुक्ताईनगर महसूल पुरवठ्याची झाली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन दिवसाआधी रात्री धान्य गोडाऊनमध्ये चोरी झाली व अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसून नेमका हा काय प्रकार आहे. पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारीच तर यात सहभाग नाही ना अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास शासकीय गोडाऊनमधून काही धान्य दाखल चोरटे धान्याच्या गोण्या चोरून घेऊन गेले. तात्काळ खबरदारी म्हणून महसूल, पुरवठा कर्मचारी व पोलीस गेले. परंतु वस्तुस्थिती पाहता काळा धंदा गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सुरू असल्याचे समजले. एवढ्या सहज व जिकरीने चोरी होतेच कशी या मागचा मास्टर माईंड कोण? त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे. परंतु महसूल प्रशासन ते शोधणे व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे
रोज ८ ते १० गोण्या धान्य शासकीय गोडाऊनमधून पद्धतशीर व सामंजस्याने चोरी होत आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून मात्र एक किलो धान्य जास्तीचे मिळत नाही मग एवढे धान्य चोरी होऊन धान्यात तफावत का निर्माण होत नाही आहे. असाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यात महसूलचे कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश आहे. नंतर अशी परिस्थिती होते की “तू मारल्याचे नाटक कर, मी झोपल्याचे सोन घेतो” अशी चर्चाही नागरिकांमधून होत आहे. यात महसूल व पुरवठा प्रशासनाचे कर्मचारी तर नाही ना की, असे गोरगरिबांच्या तोंडाचे हे अन्न चोरून काळ्या बाजारात विकत आहे त्याचीही खोलवर चौकशी होणे गरजेचे आहे.

शासकीय धान्य गोडाऊनला समोरच्या बाजूस असलेल्या शटरला कुलूप आहे. परंतु त्याच मागील बाजूस असलेल्या शटरला आतून कुलूप न लावता साधे नट बोल्ट लावून चोरी करता चोरी करणाऱ्या सहज पर्याय दिला आहे. तसेच शटर जवळील छोट्या खिडकीच्या ग्रील तुटलेल्या अवस्थेत असून त्यातून सहज एक दोन जण आत जाऊ शकतात मागील शटरचे धान्याच्या गोण्या बाहेर फेकू शकतात. इतकं सहज चोरी करणे तसेच धान्य गोडाऊनमध्ये किंवा आजूबाजूला एकही सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आजपर्यंत कधी प्रशासनाला बसली नाही का ? असे प्रकार अनेक वेळा घडले. गोरगरिबांना एक किलो ही धान्य देण्यास महसूल वापर जिल्हा पुरवठा तयार नाही, परंतु असे गोरगरिबांच्या वाटेचे धान्य सोडून काळ्या बाजारात विकणाऱ्यांवर मात्र नागरिक संताप व्यक्त करत आहे.

या ठिकाणी शक्य तसंच झालं बाहेरील कोणी व्यक्ती अशा प्रकारची किंमत करतोच की, महसूल मधीलच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आशीर्वादाने तर हा गोरख धंदा सुरू नाहींना हेही वरिष्ठ पातळीवरून तपासणी गरजेचे आहे. गोरगरिबांच्या अंगावर घाला घालण्यारावर कठोर कारवाई करा अशी भूमिका शिवसेना तालुकाप्रमुख फोटो भोई यांनी घेतली यावेळी महसूलचे रोठा निरीक्षक गावडे साहेब ,सावकारे साहेब, पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.

मुक्ता नगरला तहसीलदार मिळेल का, गेल्या आठ महिन्यांपासून मुक्ताने करत असेल कार्यालय येथे कायमस्वरूपी तहसीलदार मिळालेले नाही त्यामुळे प्रभारी राज असलेल्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रभारी राज गाजविला जात आहे. मुक्ताईनगर शहरातील एका विशिष्ट भागातून आठवड्यातून दोन ते तीन वेळा मोठा ट्रक बाहेर विक्रीसाठी तांदुळाचा माल घेऊन जातो याकडेही महसूलच्या कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Protected Content