मोहाडी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । पाण्याने भरलेल्या डॅम्पची साफसफाई करतांना पायात वायर अडकल्याने मोहाडी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

store advt

याबाबत माहिती अशी की, जैन व्हॅली जवळील अनुभूती शाळेच्या आवारात डीव्हाईन पार्कमध्ये असलेल्या तलावात कामावर असलेला तरूण शंकर तुकाराम सपकाळे (वय-३२) रा. मोहाडी ता.जि.जळगाव हा साफसफाईचे काम सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास करत होता. तलावातून अंडरग्राऊंड ईलेक्ट्रिक वायर असल्याचे साफसफाई करतांना शंकरचा पाय अडकला. त्यात त्याचा पाण्यात मृत्यू झाला. शंकर हा पोहण्यात तरबेज होता मात्र त्याचा पायात वायर अडकल्याने त्याला पोहताही आले नाही, त्यातच त्याचा अंत झाला. जैन कंपनीच्या रूग्णवाहिकेने तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी मृत घोषीत केले. दरम्यान, शंकरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.

नातेवाईकांचा आक्रोश
मयत शंकर सपकाळे यांचे दोन मोठे भाऊ जैन कंपनीत कामाला आहे. मोठा भाऊ किशोर सपकाळे हे टिश्यू कल्चर विभागात तर दुसरा ईश्वर सपकाळे हे सोलार डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतात. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात भावाचा मृतदेह पाहताच दोन्ही भाऊ व वडील यांनी प्रचंड आक्रोश केला. तर नातेवाईक आणि मित्र परिवार यांनी गर्दी केली होती. मयताच्या शंकरच्या पश्चात पत्नी निता, आई अंजनाबाई, मुलगा देवांश, बहिण चंद्रभागाबाई, दोन भाऊ, वडील तुकाराम सपकाळे असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!