रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील जी.एस.रायसोनी महाविद्यालयात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात महाविद्यालयात रक्तदान शिबीर तर काव्यरत्नावली चौकात पथनाट्यासह समूहनृत्य, गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.

शिरसोली रोडवरील जी.एस.राससोनी महाविद्यालयात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त आज बुधवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रक्तादान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन संचालिका प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीरात ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासह सेल्फी काढून हर घर तिरंगा उपक्रमाच्या संकेतस्थळावर अपलोड केले. त्यानंतर देशभक्तीपर गीते व नृत्य स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजेनंतर काव्यरत्नावली चौकात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची जनजागृती करण्यासाठी एक शाम देश के नामया शीर्षकाखाली विद्यार्थ्यांनी नागरिकांसमोर पथनाट्यासहित समूहनृत्य व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करून सामान्य जनतेत देशप्रेमाची भावना निर्माण केली.

 

या कार्यक्रमाला प्रा.श्रिया कोगटा, प्रा. वसीम पटेल, प्रा. रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. तन्मय भाले, रजिस्टार अरुण पाटील, प्रकाश पाटील, प्रा. सोनल तिवारी, प्रा.डॉली मंधान यासह रॉटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट विध्यार्थी सदस्यांचे व रेडक्रॉस रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

Protected Content