अचानक ब्रेक लावल्याने भरधाव बसची दुचाकीला धडक

jalgaon crime news 2

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी रावेर-संगमनेर बस (एमएच 20 बीएल 2398) भुसावळमार्गे जळगाव येथे येत असतांना राष्ट्रीय महामार्गावरील दुरदर्शन टॉवर जवळ पुढे जात असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएच18 बीपी 8456) पुढे जात असतांना दुचाकीने अचानक ब्रेक मारल्याने दुचाकी खाली पडून दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी बसचालक दिपकसिंग परदेशी यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास अतुल पाटील करीत आहे.

Protected Content