ए.टी.झांबरे विद्यालयात ‘स्वातंत्र्याचे आधारस्तंभ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईच्या ए.टी.झांबरे विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वातंत्र्याचे आधारस्तंभ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य संग्रामाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली

भारत मातेच्या भूमीत रामाचे रामराज्य निर्माण झाले. न्यायाने चालणाऱ्या शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. अशा या भूमीवर इंग्रजांनी राज्य केले आणि भारतीय लोकांना गुलामीत अडकवले. या गुलामीतून सुटका करून घेण्यासाठी भारतीय लोकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. या क्रांतिकारकांची स्वातंत्र्यसैनिकांची मुलांना ओळख व्हावी, त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा या उद्देशाने ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचे आधारस्तंभ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात १८५७ च्या उठावापासून १९४७च्या स्वातंत्र्यापर्यंत ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यसैनिकांनी, समाज सुधारकांनी देशासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. त्या ७५ स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. झाशीची राणी लक्ष्मीबाईपासून ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत विविध भूमिका ७५ विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक इ.पी. पाचपांडे, एस.एम. शिरसाळे, डी.बी चौधरी, पी.सी. लोहार, सी.बी. कोळी, पराग राणे यांनी सहकार्य केले.

Protected Content