मुक्ताईनगरात आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । रुग्णवाहिका मिळावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लेखी पत्रव्यवहार केला असून पालकमंत्र्यांनी दि.12 जून रोजी शासनाकडून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास एक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी रुग्णवाहिका पाठविली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण व पूजन आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

येथील उपजिल्हा रुग्णालय कोरोना काळात रूग्णांना नवसंजीवनी देणारं माध्यम ठरलेले असून या ठिकाणी उपचारासाठी रुग्ण मोठ्या संख्येने धाव घेत असतात. त्यातच या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची स्वतः ची रुग्णवाहिकाच नसल्याने  जिल्हा रुग्णालयाची 102 नंबर ची रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्पुरत्या स्वरूपात दिली होती.यामध्ये देखील अनेक वेळा बिघाड होणे , टायर फुटणे, खराब होणे या अडचणी मुळे येथे रुग्णवाहिके अभावी रुग्ण व नातेवाईकांची प्रचंड फरफट होत होती. त्यामुळे येथे रुग्णवाहिका मिळावी यासाठी आमदार चंद्रकांतजी पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील लेखी पत्रव्यवहार केला होता.तसेच पालकमंत्री मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुक्ताईनगर येथे आले असता त्यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली होती .यावेळी ही आमदार चंद्रकांतजी पाटील यांनी रुग्णवाहिकेची नितांत गरज असल्याची  पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्याने पालकमंत्री ना गुलाबरावजी पाटील यांनी काल दि.12 जून रोजी शासनाकडून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास एक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी रुग्णवाहिका पाठविली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण व पूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  आज दि.13 जून रोजी पार पडले .

प्रसंगी सोबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, डॉ. नम्रता अच्छा, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, शहर प्रमुख गणेश टोंगे, गटनेता राजू हिवराळे , युवा सेना पदाधिकारी  पवन सोनवणे, पंकज राणे,  उपस्थित होते.

 

Protected Content