विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या रावेर लोकसभापुर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी चेतन अढळकर यांची निवड

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांची विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

जळगाव येथे महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संघटनेची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोजिराव पांचाळ यांच्या आदेशाने व राज्य उपाध्यक्ष संजय दीक्षित, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज बांधवांनी घेतलेल्या सर्वानुमताने रावेर लोकसभा पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी यावलचे युवा समाजसेवक चेतन अढळकर यांची निवड करण्यात आली आहे . याप्रसंगी समाजाप्रती निष्ठावान कर्तव्यदक्ष व जुने कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. चेतन अढळकर हे समाज संघटन जोडण्यासाठी तथा संघटनेचा प्रसार प्रचार करण्यासाठी तत्पर राहतील असा विश्वास संघटनेच्या राज्य कार्यकारणीतिल पदधिकारी यांनी व्यक्त केला. त्याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष संजय दिक्षित, राज्य सदस्य भगवान वाघ, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे, जळगाव शहराध्यक्ष सिद्धू चव्हाण, श्रमिक अध्यक्ष संजय सांगळे, महिला जळगाव जिल्हाध्यक्ष अनिता सांगोळे, प्रदिप अहिरे( भुसावळ), सुरेश सुरडकर (अमळनेर), जे. बी. जाधव (जळगाव), सुरेश सपकाळ (जळगाव) यांची उपस्थिती होती. या सर्व समाज बांधवांच्या वतीने चेतन अढळकर यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.

Protected Content