आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या दारी ञुटीतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन

पाचोरा, प्रतिनिधी | ञुटीतील शिक्षकांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निवास्थानासमोर १ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.  घरी असलेल्या शिक्षक बांधवांनी आंदोलनस्थळी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

राज्यात मंत्रालयीन समितीच्या विभागवार तपासणीमध्ये १२, १५ तसेच २४ फेब्रुवारी २१ च्या शासन निर्णयात विनाकारण त्रुटी दाखवून शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वर्ग तुकड्यांना अपात्र तथा त्रुटीत काढले गेले. या त्रुटीतील शाळांच्या विभागवार तपासणीत पात्र ठरलेल्या शाळांना ३० दिवसांच्या आत त्रुटी पूर्तता करण्याचे सांगून आज ९ महिने झाले तरी अद्यापही पात्रतेसह निधी देण्याचा शासन निर्णय निर्गमित होत नाही. त्यामुळेच या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वर्ग तुकड्यांतील शिक्षक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या शाळांना पात्र ठरवण्यासाठी शिक्षक आमदार यांच्या उपस्थितीत सुनावणी घ्याव्यात असे शिक्षक आमदार यांनीच निवेदन शालेय शिक्षणमंत्री यांना दिले होते. त्यानुसार विभागवार सुनावणी पार पडून आज ९ महिने झाले आहेत अद्यापही ना पात्र यादी, ना वेतन अशी दैयनिय अवस्था झाली आहे. तीनवेळा अर्थविभागाकडे पाठपुरावा करुनही काहीबाबतीत काही त्रुटी काढून परत शिक्षण विभागात पाठवली जात आहे. शिक्षक आमदार यांनी योग्य पाठपुरावा केला असता तर आतापर्यंत न्याय मिळाला असता. तुर्तास या शाळांतील भवितव्य पूर्णतःअंधारात गेलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुधीर तांबे शिक्षक आमदार म्हणून सुनावनीसाठी हजर होते. तर या शाळांच्या पात्रतेसह वेतन मिळवून देण्याची जबाबदारी देखील शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचीच आहे. वंचित शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा व वेतनाची उणीव भरून काढण्यासाठी आपल्या दारात ” त्रुटीतील शिक्षक ” एकत्र येऊन येत्या १ नोव्हेंबर पासून आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे निवासस्थानी बेमुदत बसून न्याय मागत आहेत.
तसेच बेमुदत आंदोलनाचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नाशिक विभागीय पदवीधर आमदार सुधीर तांबे, नागपुर विभागीय अभिजित वंजारी यांचे कडे ञुटीतील समन्वय संघाचे समन्वयक प्रा. सुरेश कापुरे, प्रा.महेंद्र बच्छाव, प्रा. विजय सोनवणे, प्रा. सुदाम राठोड , अनिल पाटील, एस. डी. पवार, डी. आर. मोहीते, आनंद चकोर, मनोज वाघचौरे, एस. एम. सोनार, एल. व्ही. खैरनार, एम. बी. जोशी, आर. एस. अमृतकर, व्ही. जी. जाधव, अरूना वाघ, शामराव सोनवणे, अशोक जाधव, बाळासाहेब शेलार, रमेश बडे आदींनी सर्व त्रुटीतील प्राथ, माध्य व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित व अजुनही जे घरी असलेले बांधव आहेत त्यांनी आंदोलन स्थळी यावे तेव्हाच आपला प्रश्न सुटेल असे आवाहन करण्यात आले.

Protected Content