एरंडोल व धरणगाव तालुक्याची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठक

baithak 1

एरंडोल प्रतिनिधी । येथील व धरणगाव तालुक्याची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तातडीची आढावा बैठक दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता तहसील कार्यालयात प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावेळी प्रांताधिकारी यांनी ग्रामीण भागात विद्युत पुरवठयाबाबत काळजी घेणे, रस्त्यावर झाडे पडल्यास तात्काळ अडथळा दूर करणे, नुकसान पंचनामे तात्काळ सुरू करावे, नांदेड ता.धरणगाव ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे, ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, महावितरण, पशुवैद्यकीय, आरोग्य विभाग डॉक्टर यांनी मुख्यालयी रहाणे आवश्यक आहे, लोक स्थलांतर करणे, जुन्या पडक्या घरातील लोक तलाठी आणि ग्रामसेवक यांनी हलविणे, शुद्ध पिण्याच्या पाणी बाबत काळजी घेणे, साथीचे रोग काळजी घेणे, गावकरी यांना आवश्यक सूचनेबाबत दवंडी देणे, सर्वविभाग यांनी 1 कर्मचारी पावसाळा संपेपर्यंत आपत्ती कक्ष म्हणून रात्री कार्यालयात ठेवणे आवश्यक आहे. असा विविध सुचना यावेळी देण्यात आल्या.

यांची होती उपस्थितीत

यावेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस, गटविकास अधिकारी धरणगाव स्नेहल कुडचे, गटविकास अधिकारी एरंडोल गायकवाड,
पो.नि एरंडोल अरुण हजारे, पो.नि. धरणगाव देसले, पो.उप.नि. कासोदा जाधव, नायब तहसिलदार धरणगाव वाडिले, उपकार्यकरी अभियंता mseb वाणी, इंगळे, माळी, तालुका कृषी अधिकारी धरणगाव तसेच ग्रामीण रुग्णालय पशुसंवर्धन,Bsnl आणि आरोग्य विभाग, गिरणा प्रकल्प, सा.बा.विभाग, नगरपालिका या विभागाचे प्रतिनिधी हजर होते.

Protected Content