पाचोरा येथे सर्पतज्ज्ञ निलमकुमार खैरे यांचे मार्गदर्शन शिबीर

 पाचोरा, प्रतिनिधी  । जागतिक सर्पमित्र दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील व परिसरातील सर्पमित्रांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सर्पमित्रांना साप पकडणे, सापांच्या विविध जातींची ओळख होऊन प्रत्येक जातीच्या सापाचे गुणधर्म आदींची माहिती देण्यात आली. 

 

पाचोरा येथील निसर्गराजा न्यूजचे संपादक व वेब मिडिया असोसिएशन पदाधिकारी आतिक चांगरे यांनी जागतिक सर्पमित्र दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील व परिसरातील सर्पमित्रांना साप पकडणे, सापांच्या विविध जातींची ओळख होऊन प्रत्येक जातीच्या सापाचे गुणधर्म व विविध विषयांवर जास्तीतजास्त माहिती मिळावी याकरिता महाराष्ट्राचे प्रसिद्ध सर्पतज्ञ निलमकुमार खैरे यांना पाचोरा नगरीत आणून सर्पमित्रांसाठी कार्यशाळेचे आयोजन येथील स्व.राजीव गांधी हॉलमध्ये केले होते.  अतिष चांगरे यांना लहानपणापासून निसर्ग, वन्यप्राणी व वन्यजीव यांच्याबद्दल आवड व जिव्हाळा आहे. त्यांनी आजपर्यंत हजारो सापांना जीवदान दिले असून अपघाताने किंवा घातपाताने जखमी किंवा जायबंदी झालेल्या माकड, हरिण, नीलगाय, रानडुक्कर, या शेकडो जंगली प्राण्यांना स्वखर्चाने उपचार करुन जीवदान देऊन परत जंगलात नेऊन सोडले आहेत. ते येथेच थांबले नसून जंगलाचे रक्षण करण्यासाठी व वनसंपत्ती वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. याकरिता ते झाडे लावा झाडे जगवा, शिकार बंदी असे विविध उपक्रम राबवून जनजागृती करत असतात. म्हणून त्यांनी सदर कार्यशाळेचे आयोजन केले होते.  या कार्यशाळेत सर्पतज्ञ  निलमकुमार खैरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पाचोरा वेब मिडीया असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

Protected Content