पारोळ्यात शासकीय कापूस खरेदीस प्रारंभ

पारोळा प्रतिनिधी ।  येथील ओम नमः शिवाय जिनिंग तर दळवेल येथील लक्ष्मी जिनिंग येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सीसीआयच्या अंतर्गत कापुस पणन महासंघाच्या कापुस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. 

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाचे संचालक संजय पवार, पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, तहसिलदार अनिल गवांदे, बाजार समितीचे संचालक चतुर पाटील, तालुका उपनिंबधक जी.एच.पाटील, बाजार समितीचे उपसभापती दगडु पाटील, बाजार समितीचे संचालक विजय पाटील, मधुकर पाटील, प्रा. बी.एन.पाटील, प्रेमानंद पाटील, दिपक पिंगळे, .राजु मराठे, डॉ. पी.के.पाटील, नानासो.पोपट वंजारी, बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी, पारोळा शिवसेना  शहरप्रमुख अशोक मराठे, शहरतलाठी निशिकांत माने, तसेच बाजार समितीचे संचालक, कर्मचारी, पणन महासंघाचे अधिकारी,  जिनिंग मालक, चालक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील एकही शेतकरी कापुस विक्री पासुन वंचित राहायला नको, शेतकर्‍यांचा कापुस मोजमाप करतांना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन योग्य त्या उपाय योजना करा. तसेच कट्टी संदर्भात आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सुचना केल्या.

 

Protected Content