यावल कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती

यावल, प्रतिनिधी | मतदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी व हक्क आहे, त्यासाठी निरपेक्ष व प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणे आवश्यक आहे. दीर्घकाळ , सदृढ व सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे प्रतिपादन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय डी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

 

ज. जि. म. वि. प्र. समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शक मनोज पाटील यांनी एक मत काय करू शकते याचे विविध उदाहरण देऊन स्पष्टीकरण केले. कार्यक्रमात स्वयंसेवक हेमंत भालेराव (टी.वाय. बी.ए.) व शहारुख तडवी (एफ.वाय. बी.ए) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिवस ‘मतदारांसाठी प्रतिज्ञा’ कु. देवयानी बडगुजर (एफ. वाय. बी. कॉम) हिने स्वयंसेवकां सोबत घेतली. हा कार्यक्रम उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील व प्रा. एम. डी. खैरनार यांच्या मार्गदर्शनाने पार पडला. कार्यक्रमात ई. आर. सावकार हे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. डी. पवार यांनी केले तर आभार प्रा. डी.एन. मोरे यांनी मानले.यशस्वितेसाठी कासीम तडवी, राजिक शहा, लोमेश तायडे, चंद्रशेखर कोळी व इतर स्वयंसेवकांनी कामकाज पहिले.

Protected Content