उद्यापासून सुरू होणार आ. मंगेश चव्हाण यांची रायगड मोहीम !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्यभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी यंदा तब्बल साडे तीन हजार युवकांना रायगडावर नेण्याची व्यवस्था करण्यात आली असून ही मोहिम उद्यापासून सुरू होत आहे.

आमदार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेल्या २ वर्षांत २७०० हून अधिक तरुणांना रायगड मोहिमेच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे याची देही याची डोळा दर्शन घडवून आणण्यात आले आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होत असल्याचे औचित्य साधून चाळीसगाव तालुक्यातील ३५०० युवकांना किल्ले रायगडावर नेण्याचा संकल्प आमदार चव्हाण यांनी केला आहे. रविवारी दि.४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांची महाआरती व रायगड मोहीम शुभारंभ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

दिनांक ४ जून ते ७ जून २०२३ अश्या चार दिवसांची ही मोहीम असणार आहे. येऊन जाऊन जवळपास ९०० हून अधिक किलोमीटर अंतराची रायगड मोहीम असून अश्या प्रकारचा उपक्रम राबविणारे आमदार मंगेशदादा चव्हाण हे राज्यातील एकमेव लोकप्रतिनिधी आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांनी रायगड वारीसाठी जय्यत तयारी केली आहे. यात प्रवासासाठी ४५ राज्य परिवहन महामंडळाच्या ४५ नव्या कोर्‍या बसेस तसेच ५० खाजगी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या चार दिवसात १४ हजाराहून अधिक व्यक्तींचे जेवण आणि नाश्ता ठिकठिकाणी चाळीसगाव येथून सोबत असणार्‍या आचारी यांच्याकडून बनवला जाणार आहे. तसेच प्रवासात ठिकठिकाणी आणि रायगड किल्य्यावर जाताना शिवप्रेमींसाठी १ लिटरच्या १५ हजार पाणी बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सहभागी सर्व शिवप्रेमींना प्रत्येकी १ असे आकर्षक टी शर्ट देखील दिले जाणार आहेत. सोबत आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून दोन रुग्णवाहिका व औषधोपचार कीट देखील असणार आहे. यासाठी जवळपास १०० हून अधिक भाजपा कार्यकर्ते / स्वयंसेवकांची यंत्रणा गेल्या ,महिनाभरापासून कामाला लह्ली आहे. या सर्व प्रवासात आमदार मंगेश चव्हाण हे शिवप्रेमी यांच्या सोबतच राहणार आहेत हे विशेष.

आपल्या या रायगड वारीबाबत आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रध्दा असणारी स्वाभिमानी, नीतीवंत, निर्व्यसनी युवा पिढी घडविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी २०१९ मध्ये ४०० हुन तरुणांना रायगड वारी घडवून आणली होती. त्यावेळी पुढील काळात दरवर्षी किमान १००० तरुणांच्या कपाळी रायगडाची माती लावेल असा संकल्प केला होता. मध्यंतरी कोविड मुळे २ वर्ष यात खंड पडला. नंतर २०२२ मध्ये मागील वर्षी १५०० तरुणांना रायगड दर्शन घडविता आले. यावर्षी चाळीसगाव शहर व तालुक्यातील जवळपास ३५०० तरुण यात सहभागी करण्याचे नियोजन असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक शिवप्रेमी आमदार या नात्याने शिवरायांचे आदर्श विचार मतदारसंघातील तरुण पिढीत रुजावेत यासाठीच हा अट्टाहास असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

रायगड वारीचे असे आहे वेळापत्रक

रविवार दिनांक – दि.४ जून २०२२

वेळ सायंकाळी ५.३० वा. – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मा.आमदार मंगेशदादा चव्हाण व शिवप्रेमींच्या उपस्थितीत महाराजांची महाआरती व पूजन

रात्री ७ वा. – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रस्थान व मोहिमेस सुरुवात

सोमवार दि.५ जून २०२२

सकाळी ७ वा. – पिरंगुट जि.पुणे येथील विमल गार्डन मंगल कार्यालय येथे आगमन व नाश्ता चहा साठी थांबा

सकाळी ९ वा. – पिरंगुट जि.पुणे येथून मुळशी ताम्हीणी घाट मार्गे हरवंडी ता.माणगाव जि.रायगड कडे प्रस्थान

दुपारी १ वा. – हरवंडी ता.माणगाव जि.रायगड येथील शांतीनिवास आश्रम येथे आगमन ,जेवण व विश्राम

सायंकाळी ६ वा. – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, शिवव्याख्याते प्रदिप देसले यांचे व्याख्यान व आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा तरुणाईशी संवाद

रात्री ९ वा. – जेवण व किल्ले रायगड कडे प्रस्थान

मंगळवार दि.६ जून २०२२

रात्री २.३० वा. – राजधानी किल्ले रायगड पायथा येथे आगमन व गड चढाईस सुरुवात

सकाळी ६ वाजता – होळीचा माळ येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत – शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभाग तसेच बाजारपेठ मार्गे जगदीश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज समाधी दर्शन

दुपारी ११ वाजता – मोहिमेत सहभागी सर्वांनी आहे त्या परिस्थितीत व ज्या ठिकाणी असाल त्याठिकाणाहून रायगड उतरण्यास सुरुवात करावी

दुपारी ३ वाजता – रायगड पायथा येथे आपल्या बसेस जवळ जमणे व तेथून हरवंडी ता.माणगाव जि.रायगड कडे प्रस्थान

सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत – हरवंडी ता.माणगाव जि.रायगड येथे आगमन व जेवण आणि तात्काळ चाळीसगाव कडे मुळशी ताम्हिणी घाट पुणे नगर मार्गे प्रस्थान

बुधवार दि.७ जून २०२२

सकाळी ५ ते ७ वाजता – संगम लॉन्स (प्रवरासंगम) ता.नेवासा जि.नगर येथे आगमन, चहा-नाश्ता व तत्काळ चाळीसगाव कडे प्रस्थान

सकाळी १० वाजता – चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आगमन व मोहिमेची सांगता.

Protected Content