रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २३३ वर : ९०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी

बालासोर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडिशामध्ये काल रात्री झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या तब्बल २३३ वर पोहचली असून या भीषण अपघातात ९०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने भीषण अपघात झाला आहेया अपघातात २३३ जणांचा मृत्यू झाला असून ९०० जण जखमी झाल्याची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. यशवंतपूर-हावडा सुपरफास्टने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या काही डब्यांच्या रुळावरून घसरलेल्या बोगींना धडक दिली आणि ती विरुद्ध रुळावर पडली, यातून हा अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केले असून सकाळ झाली तरी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.

या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर ट्विट करत या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. मी रेल्वेमंत्र्यांशी बोललो, परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे.

Protected Content